सेवानिवृत्तीची तारीख कॅल्क्युलेटर
जन्मतारीख आणि निवृत्तीचे वय (उदा. 60) टाका. तुमची सेवानिवृत्तीची तारीख, वार आणि आणखी किती वर्षे-महिने उरले हे लगेच कळेल. सरकारी सेवेत रुजू होणाऱ्यांसाठी उपयुक्त.
निवृत्तीची तारीख कशी ठरते?
सामान्य नियम: जन्मतारीख 1 नसेल तर वाढदिवसाच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी; जन्मतारीख 1 असेल तर आधीच्या महिन्याच्या शेवटच्या दिवशी निवृत्ती होते.
उदाहरण
जन्मतारीख 15 जून 1996, निवृत्तीचे वय 60: निवृत्ती 30 जून 2056. जन्मतारीख 1 जून 1996: निवृत्ती 31 मे 2056.
वारंवार विचारले जाणारे प्रश्न
निवृत्तीचे वय किती असते?
विभागानुसार बदलते (उदा. 58, 60 किंवा 62). तुमच्या विभागाचे नियम पाहा.
निवृत्ती आणि मुदतवाढ?
काही प्रसंगी मुदतवाढ मिळू शकते. तो विभागाचा निर्णय असतो.
निकाल अधिकृत आहे का?
नाही. अधिकृत तारखेसाठी तुमची सेवा पुस्तिका पाहा.
